समाजशिल्पशास्त्रज्ञ सायाजीरावांची ओळख

₹100

AUTHOR :- Baba Bhand

ही नवी ओळख आहे – समाजशिल्पशास्त्रज्ञ महाराजा सयाजीराव गायकवाड या भारताच्या सुपुत्राची. आजच्या आधुनिक भारताच्या जडणघडणीचे एक शिल्पकार असलेल्या या महाराष्ट्राच्या राजाने स्वतः शिकून जगभरातील प्रशासन पद्धतीचा अभ्यास करत सुप्रशासन आणि जनतेच्या ज्ञानात्म प्रबोधनातूनच जनकल्याणाचा ध्यास घेतला.

शिक्षण-विज्ञान हेच प्रगतीचे परिवर्तनाचे साधन आहे हे ओळखून या देशात प्रथमच सक्तीचे प्राथमिक मोफत शिक्षण, सुप्रशासन-न्याय, शेती उद्योगांना मदत, धर्म खात्याच्या माध्यमातून सामाजिक-धार्मिक सुधारणा करून मानवता व सर्वधर्मसमभावाचा मार्ग निवडला.

शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अन् वाङ्मयीन कलांचे सयाजीराव आश्रयदाते होते. पितामह नौरोजी, जमशेटजी टाटा, ना.गोखले, म. गांधी, लो. टिळक, न्या. रानडे, स्वा. सावरकर, म. शिंदे, म. फुले, डॉ. आंबेडकर, पं. मालवीय, कर्मवीर भाऊराव, राजर्षी शाहू या आणि अनेक युगपुरुषांना आणि संस्थांना जगात आठव्या क्रमांकाचे श्रीमंत असलेल्या सयाजीरावांनी केलेली कोट्यवधीची मदत हे त्यांचे जगावेगळे दातृत्व होते.

सार्वभौम राजा असलेले सयाजीराव स्वातंत्र्ययोद्ध्याचे पाठीराखे, एक प्रज्ञावंत लेखक, सुप्रशासन अन् जनकल्याणातच आपला मोक्ष शोधणाऱ्या, या देशप्रेमी राजाची सर्व अंगांनी नवी ओळख या ग्रंथातून करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समाजशिल्पशास्त्रज्ञ सायाजीरावांची ओळख”

Your email address will not be published. Required fields are marked *