मुद्रण महर्षी दामोदर सावळाराम यंदे

‘दामोदर सावळाराम यंदे’ यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला.
रोजीरोटीसाठी वडिलांबरोबर मुंबईला स्थलांतर केले.

शालेय वयातच महात्मा फुले आणि दयानंद सरस्वतीच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांच्या नव विचारांतून प्रेरणा घेतली. समाजप्रबोधनाच्या तळमळीमुळे साधनांची कमतरता असतानाही ‘सृष्टीदर्पण’ साप्ताहिकाची सुरुवात केली. त्यानंतर ‘बडोदा वत्सल’, ‘श्रीसयाजीविजय’, ‘श्रीशिवाजी’ आणि ‘ज्ञानमंदिर’ ही वृत्तपत्रे सुरू केली. गौरवशाली ‘इंदुप्रकाश’ सक्षमपणे चालवला.

‘दीनबंधु’ आणि ‘शेतकऱ्यांचा कैवारी’ वृत्तपत्रांची संपादकीय जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. पुढे ‘दीनबंधु’ आणि ‘नवा मनू’ वृत्तपत्रांच्या पुनर्जीवनास मदत केली.
शिष्यवृत्तीपासून ब्राह्मणेतर चळवळीपर्यंतच्या सर्व समाजसुधारणेत सक्रिय सहभाग नोंदवला. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, नारायण मेघाजी लोखंडे, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, कृ.अ. केळूसकर, चिं.वि. वैद्य, महाराजा सयाजीराव, रियासतकार सरदेसाई, कवी चंद्रशेखर गोहे, राजर्षी शाहू, प्रबोधनकार ठाकरे, दीनमित्रकर मुकुंदराव पाटील, डॉ. आंबेडकर आणि दीनानाथ मंगेशकर अशा अनेक मान्यवरांशी घनिष्ठ स्नेह ठेवला.

सयाजीराव महाराजांच्या प्रेरणेने बडोद्यात ग्रंथसंपादक मंडळीची स्थापना केली. मराठीत चारशे मौलिक ग्रंथांचे प्रकाशन केले. एवढे अद्वितीय कार्य करूनही प्रसिद्धिविन्मुख राहिले. आयुष्यात अनेक चढ-उतार आणि यश-अपयशाचा सामना केलेल्या संपादक, लेखक, प्रकाशक आणि समाजसुधारक ‘मुद्रणमहर्षी’चे हे रोमांचकारी चरित्र.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुद्रण महर्षी दामोदर सावळाराम यंदे”

Your email address will not be published. Required fields are marked *