आज जगात विमानाच्या शोधाने क्रांती झाली आहे; पण याची सुरुवात शिवकर बापूजी तळपदे या मुंबईतील संस्कृत पंडिताने केली होती, हे आपणास माहीतच नाही.
आर्य समाजाच्या स्वामी दयानंद सरस्वती यांनी आपल्या प्राचीन वेदग्रंथात विमानकलेचे संदर्भ सांगितले.
शिवकर तळपदे यांनी महर्षी भारद्वाज यांच्या ‘यंत्र सर्वस्व’ या संस्कृत ग्रंथातील विमानासंबंधीचा अभ्यास केला.
पहिल्या वैदिक विमानाचा आराखडा केला.
तो आराखडा त्यांनी न्या. महादेव गोविंद रानडे यांना दाखविला. महाराजा सयाजीराव गायकवाड यांना मदतीची विनंती केली.
दूरदृष्टी महाराजा सयाजीराव यांनी शिवकर तळपदे यांना ‘मरुतसखा’ या पहिल्या विमान प्रकल्पास मदत केली. तळपदे यांनी पक्ष्याच्या आकाराचे ६ फूट लांब व ४ फूट रुंदीचे मरुतसखा विमान बनविले. इ.स. १८९५ साली डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई चौपाटीवर पहिल्या मानवविरहित विमानाने पंधराशे फूट उड्डाण केले.
जगातील या पहिल्या विमानोड्डाणप्रसंगी महाराजा सयाजीराव, न्या. रानडे, लो. टिळक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या पहिल्या उड्डाणाची बातमी केसरी वृत्तपत्रात छापून आली.
ब्रिटिश सरकारला हा प्रयोग रुचला नाही.
तळपदे यांचे हे आंतरराष्ट्रीय कार्य बाजूला राहिले.
यानंतर आठ वर्षांनी राइट बंधूंनी विमानोड्डाणाचा प्रयोग केला.
शिवकर तळपदे यांनी ‘प्राचीन विमानकलेचा शोध’ हा ग्रंथ लिहिला. इ.स. १९०७ साली तो प्रकाशित झाला.
तो दुर्मीळ ग्रंथ आम्ही प्रकाशित करीत आहोत; मात्र या ग्रंथात तळपदे यांनी स्वतः केलेल्या पहिल्या विमानोड्डाण प्रयोगाचा उल्लेख केला नाही.
यामागे तत्कालीन ब्रिटिश सरकारची भीती हे एकच कारण असावे. या विषयाच्या अभ्यासक, संशोधकांनी जगातील पहिल्या विमानोड्डाणाचा आणखी शोध घ्यावा, ही अपेक्षा.
Reviews
There are no reviews yet.