सार्वभौम महाराजा सयाजीराव स्वातंत्र्यवीरांचे पाठीराखे

भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे.
आपल्या देशातील हजारो- लाखो स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, क्रांतिकारक आणि जनसामान्यांचा त्याग, समर्पण, समर्थन, संघर्षातून भारताला स्वातंत्र्य मिळाले.
या स्वातंत्र्यास पंचाहत्तर वर्षे होत आहेत. दीडशे वर्षे ब्रिटिश सरकारची भारतावर सत्ता होती.

५६४ लहान-मोठे संस्थानिक / राजे इंग्रजांचे मांडलिक होते. यापैकी बडोदा संस्थान व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा मूळ करार मैत्रीचा होता. किशोरवयीन सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांनी तो अभ्यासला. आपण ब्रिटिश सरकारचे मांडलिक नसून मित्र आहोत हा सार्वभौमत्वाचा धागा सयाजीरावांना सापडला.
त्यांनी मुत्सद्देगिरीने हा धागा बळकट केला. आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचा आत्मविश्वास यातून सयाजीरावांना लाभला.

या पार्श्वभूमीवर द्रष्टे सयाजीराव गायकवाड हुशारी अन् गनिमी काव्याने स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे झाले.
अरविंद घोष, बॅ. केशवराव देशपांडे, खासेराव जाधव हे स्वातंत्र्यवीर बडोद्यात नोकरी करून क्रांतिवीरांना मदत करू लागले.

ब्रिटिश सरकारने सयाजीराव गायकवाड यांच्या या राजद्रोही कारवायांविरुद्ध सी.आय.डी.चे गुप्तहेर लावले.
सयाजीराव गायकवाडांनी छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याने संघर्ष करून सी.आय.डी. ला हतबल बनविले.

राजद्रोहाच्या आरोपाची एकेक फाइल ठोस पुरावा न मिळाल्याने ब्रिटिश सरकारला नाइलाजाने बंद करावी लागली. ती कागदपत्रे कोणालाही पाहता येऊ नयेत म्हणून ब्रिटिशांनी ‘A Banded Box Case’ शिक्का मारून साठ वर्षे गोपनीय ठेवली. त्यातील पंधरा फाइल्स स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात मिळाल्या आहेत.

स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे असलेले सयाजीराव हे देशभक्त, लोकशाहीवादी, निष्कलंक चारित्र्य असलेले निर्व्यसनी राजा होते.
सयाजीरावांचा दर्जा ‘सार्वभौम राजा’चा होता. इंग्लंडच्या सुप्रीम कोर्टात या संदर्भातील केस सयाजीराव गायकवाडांनी जिंकली होती. इंग्लंडच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने भारतातील ब्रिटिश सत्तेच्या पराभवाचा हा नवा ‘देशी’ इतिहास उजेडात येत आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सार्वभौम महाराजा सयाजीराव स्वातंत्र्यवीरांचे पाठीराखे”

Your email address will not be published. Required fields are marked *