शहरापासून अगदी दूरवर असलेल्या खेड्यातील एका शाळकरी विद्यार्थ्याने ‘लागेबांधे’त आपल्या जगप्रवासाची कहाणी सांगितली आहे. ती सांगतांना अन्य कुणाही लेखकाच्या शैलीची त्याने नक्कल केली नाही, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य.
-महाराष्ट्र टाइम्स
बोलकी चित्रे रेखाटण्याची विलक्षण हातोटी आणि अनुभवांच्या विविधतेमुळे पुस्तक सर्वांसाठी वाचनीय झाले आहे. प्रांजळपणा हे या प्रवासवर्णनाचे वैशिष्ट्य आहे. बाबा भांड यांचे हे पुस्तक. विश्वासही बसत नाही की, एका सोळा वर्षांच्या खेडवळ मुलाच्या अन् प्रवासात भेटलेल्या असंख्य मित्र-मैत्रिणींच्या लागेबांध्यांची ही कहाणी आहे. सोबत मातीच्या कोवळ्या पायांनी केलेला हा प्रवास आहे. साहित्यप्रांतात अगदी नवीन असलेल्या आणि खेळण्या-बागडण्याच्या वयात सारं जग फिरून आलेल्या तरुणाचं हे टवटवीत लिखाण आहे.
-साप्ताहिक तरुण भारत
केवळ प्रवासवर्णनाच्या चश्म्यातून ‘लागेबांधे’कडे पाहून चालणार नाही. तो एक शब्दपट आहे, प्रवासातील असंख्य मित्र-मैत्रिणींच्या अनुभवाचा तो एक स्मृतिपट आहे.
-अस्मितादर्श
आतापर्यंत माझ्यासमोर जी प्रवासवर्णनांची पुस्तके आहेत ती बहुतेक सर्व प्रथितयश मराठी साहित्यिकांची! त्यांची प्रवासवर्णनं यशस्वी होण्यात त्यांच्या अनुभवाबरोबर पूर्वप्रसिद्धी काही अंशी कारणीभूत झालेली असते. परंतु ती कोणतीच गोष्ट ‘लागेबांधे’ या पुस्तकाबाबत आढळून येत नाही. तरीही लागेबांधे वाचनीय झाले आहे – त्यातील प्रांजळ निवेदनशैलीमुळे.
-समाज प्रबोधन पत्रिका
Reviews
There are no reviews yet.