न पाठवलेलं पत्र !
आदरणीय महाराजा सयाजीराव, प्रणाम !
गेले काही दिवस मी खूप अस्वस्थ आहे.
यातील एक मुख्य कारण आहे, भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ! दीडशे वर्षांची ब्रिटिश सत्ता झुगारून देण्यात हजारो-लाखो स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि जनसामान्याचा त्याग, संघर्षातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. पंचाहत्तर वर्षे होत आहेत.
या देशात लहान-मोठी ५६५ संस्थानिक राजे नम्र मांडलिक होते.
फक्त बडोद्याचे महाराजा मांडलिक नव्हते. सार्वभौम राजा होते. यातून महाराजा सयाजीरावांनी दीर्घकाळ बलाढ्य ब्रिटिश सत्तेशी संघर्ष केला. एवढेच नाही तर देशभरातील क्रांतिकारकांना हिमतीने मदत केली. पाठीराखे झाले.
दीर्घकाळ ब्रिटिश सी.आय.डी. आपणास राजद्रोही ठरविण्यासाठी धडपडली अन् शेवटी हतबल झाली. आरोपाच्या फाईल्स ब्रिटिश सरकारने (A Banded Box Case) शिक्का मारून साठ वर्षे बंद केल्या. ७५ वर्षे इतिहासकारांनी बघितल्या नाही.
लंडनच्या सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. महाराजा सयाजीराव गायकवाड सरकार करारानुसार ब्रिटिश सरकारचे मित्र आहेत; मांडलिक नाहीत.
लंडनच्या ब्रिटिश अभिलेखागारातून सोळा बंद फाईल (A Banded Box Case) आणि लंडन सुप्रीम कोर्टाचे सार्वभौम राजा (Sovereign Ruler) हे जजमेंट नुकतेच आपल्या हाती आले आहे.
स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षात इतिहासातील सोनेरी पाने हाती आली. महाराज, प्रत्यक्ष राजकारभार २८ डिसेंबर १८८१ रोजी आपल्या हाती आला. त्या राज्यारोहणदिनी आपणास न पाठविलेलं हे पत्र वाचकांना सादर करीत आहे.
दि. २८ डिसेंबर १८८१ राज्यारोहण दिवस.
बाबा भांड
Reviews
There are no reviews yet.