महाराजा सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू छत्रपती हे महाराष्ट्राचे दोन युगपुरुष.
दोघेही समाजपुरुष लोककल्याण आणि समाजसुधारणांसाठी उत्तम प्रशासनाचा आदर्श होते.
राजर्षी शाहूंचे ब्रिटिशांशी मित्रत्वाचे संबंध तर सयाजीरावांनी ब्रिटिशांशी आयुष्यभर संयमाने संघर्ष केला.
एखादी गोष्ट करताना राजर्षी शाहू एकदम धडक मारत. टक्कर देऊन प्रतिस्पर्ध्यास चारीमुंडी चीत करीत. सयाजीराव एखादा निर्णय घेताना चर्चा, अहवाल बघून समतोल निर्णय घेत.
विद्याप्रसारक कामाचे सयाजीराव पहिले आश्रयदाते झाले. पुढे या कार्यात राजर्षी शाहू महाराजांनी भर घातली.
कोल्हापूर राज्य एका जिल्ह्यापुरते, तर बडोदा चार-पाचपट मोठे असल्याने राज्य उत्पादनात तो फरक होता.
राजर्षी शाहू दुर्दैवाने सत्तेचाळिसाव्या वर्षी गेले, सयाजीरावांना ७६ वर्षांचे आयुष्य लाभले होते.
व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन हिंदुस्थान सोडताना राजर्षी शाहूंना मोकळेपणाने म्हणाले, “सयाजीरावांची तुलना एखाद्या शक्तिशाली वाफेच्या इंजिनाशी करता येईल, मी जे सांगतोय ते सत्यच आहे. मी आशा करतो की, इतर राजांनीही सयाजीरावांच्या चांगल्या कामाचे अनुकरण करावे.”
Reviews
There are no reviews yet.