बारा वर्षांचा गोपाळ बडोद्याचा राजा बनला. या सयाजीराव गायकवाड यांनी चौसष्ट वर्षे राज्य केले. त्यांचा हा मोठा कालखंड हिंदुस्थानातील सामाजिक सुधारणा आणि प्रशासनाचा अनोखा इतिहास आहे.
चौदाव्या वर्षी १८७७ ला पंगतीभेद मोडलेल्या सयाजीरावांनी पाच वर्षांनी १८८२ ला हुकूम काढून अस्पृश्यांना सरकारी खर्चाने शिक्षण देणे सुरू केले.
भीमराव आंबेडकरांच्या पदवी शिक्षणाच्या पायाभरणीसह अस्पृश्यांचा क्रांतिकारक नेता डविण्यासाठी त्यांना अमेरिकेत पाठविणारे, त्यांची नऊ वर्षांच्यी शिष्यवृत्ती माफ करणारे, अस्पृश्यांना मोफत प्राथमिक व संस्कृत शिक्षण, पुरोहित परीक्षेद्वारे अस्पृश्यांना हिंदू पुरोहित होण्याची संधी देणारे, पस्तिसाव्या वर्षी बौद्ध धर्माचा परिपूर्ण अभ्यास असणारे, बडोद्यात नोकरीसाठी आलेल्या भीमरावांसाठी स्वतंत्र बंगला बांधण्याचे आदेश देणारे, जगण्यासाठी बाबासाहेबांनी पुढे राजीनामा दिला ते हिंदू कोड बिल फार पूर्वी १९०५ मध्ये बडोद्यात लागू करणारे, भारतात बौद्ध धर्माला राजाश्रय देणारे, १९३६ च्या डॉ. बासाहेबांच्या annihilation of caste या जगप्रसिद्ध प्रबंधाची पूर्वतयारी करणाऱ्या १९०९ मध्ये प्रकाशित the depressed classes या निबंधाचे लेखक आहेत महाराजा सयाजीराव गायकवाड.
म्हणूनच ‘भीमराव ते डॉ. आंबेडकर’ या क्रांतिसूत्राच्या जन्मदात्या सयाजीरावांचे चरित्र लिहिण्याची इच्छा १९५० मध्ये डॉ. बाबासाहेब व्यक्त करतात. आधुनिक भारताचे एक शिल्पकार महाराजा सयाजीराव आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन युगपुरुषांच्या संदर्भातील इतिहास जोडण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. याचे पुनर्वाचन नव्या पिढीचे आणि अभ्यासकांनी डोळसपणे करावे, ही या लेखनामागची प्रामाणिक भावना आहे.
Reviews
There are no reviews yet.