महात्मा फुले, मामा परमानंद आणि सयाजीरावांना पत्रे

₹150

AUTHOR :- Baba Bhand

एकोणिसाव्या शतकातील न्या.म.गो. रानडे, न्या.का.त्र्यं. तेलंग, न्या.ना.ग. चंदावरकर, डॉ.रा.कृ. भांडारकर हे विद्वान नारायण महादेव परमानंद यांना गुरू मानत.
न्यायमूर्ती रानडे तर त्यांचा ‘राजकीय ऋषी’ म्हणून गौरव करीत. हे नारायण महादेव परमानंद त्याकाळात मामा परमानंद या नावाने प्रसिद्ध होते.

इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन, द इंडियन स्पेक्टटर, सुबोध पत्रिका या वृत्तपत्राचे संपादक म्हणून मामा परमानंदांनी मोलाचे काम केले.
इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. राजकारणाचा सखोल अभ्यास होता.
तत्कालीन भ्रष्टाचार, बेबंदशाहीचे ते खंदे विरोधक आणि शिक्षण, सुप्रशासन, धर्म-सामाजिक सुधारणांचे पाठीराखे होते.

सयाजीराव गायकवाडांसारखा तरुण उद्याचा प्रशासक, जनसेवक व प्रज्ञावंत राजा व्हावा, असे मामा परमानंद स्वप्न पाहत होते.
बहरामजी मलबारी यांच्या द इंडियन स्पेक्टटर वृत्तपत्रात मामांनी ‘एका राजास पत्रे’ या शीर्षकाखाली १८८९ साली बारा पत्रे लिहिली. पत्रलेखक म्हणून A Political Recluse – एक राजकीय संन्यासी हे टोपण नाव घेतले.

सयाजीराव गायकवाड उत्सुकतेने ती पत्रे वाचू लागले. सुप्रशासन, जनसेवा, जनकल्याणाची कामे, शिक्षण, शेती-उद्योग ते समाजसुधारणा त्या पत्रांतील विषय होते.

Letters to An Indian Raja हे पुस्तक १८९१ साली प्रकाशित झाले. पु. बा. कुलकर्णी यांनी १९६३ साली मामा परमानंदांच्या चरित्रात ती पत्रे छापली. मामांनी सयाजीराव गायकवाड या तरुण राजाचे सुप्रशासनाचे स्वप्न पाहिले. ते स्वप्न महाराजा सयाजीराव यांनी ६४ वर्षांच्या कारभारातून सर्व क्षेत्रांत दाखवून दिले; पण पुरोगामी महाराष्ट्राने मामा परमानंद या राजकीय ऋषीकडे डोळेझाकच केली. ते अक्षरधन जनतेसमोर आणण्याचे काम सयाजीराव ट्रस्टने कर्तव्यभावनेने केले आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महात्मा फुले, मामा परमानंद आणि सयाजीरावांना पत्रे”

Your email address will not be published. Required fields are marked *