तंट्या | Tantya

₹500

528 Pages
AUTHOR :- Baba Bhand
ISBN :- 978-8177868395

तंट्या भिल्ल हा एकोणिसाव्या शतकातील लोकविलक्षण आदिवासी नायक.
आपल्या पूर्वायुष्यातील यातनामय अनुभवांचा उद्रेक होऊन उत्तरायुष्यात त्याने
बलाढ्य ब्रिटिश राजसत्तेशी आणि भोवतीच्या सरंजामशाही व्यवस्थेशी
प्रखर; पण एकाकी झुंज दिली आणि दीनदुबळ्यांच्या,
शोषितांच्या व नागवल्या गेलेल्या सर्वसामान्य शेतकरी-आदिवासींच्या
मदतीसाठी आयुष्य पणाला लावले.
सरकार-दरबारी दरोडेखोर ठरवला गेलेला तंट्या लोकमानसात मात्र
ईश्वरी अंश असलेला जननायक म्हणूनच अजरामर झाला.
त्याच्या अद्भुत, गूढ, धाडसी आयुष्याची कहाणी सर्जनाच्या पातळीवर नेणारी
बाबा भांड यांची ‘तंट्या’ कादंबरी आहे.

दंतकथा आणि लोककथा यांच्या धुक्यात धूसर झालेले तंट्याचे आयुष्य
एका बाजूने संशोधनाच्या साह्याने
आणि दुसर्या बाजूने सर्जनात्मक कल्पनाशक्तीने सुस्पष्ट करून
वास्तवाच्या जमिनीवर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कादंबरीत आहे.
मात्र असे करताना हा कादंबरीकार
लोकप्रियतेचे रंजक तंत्र आणि
अनावश्यक अलंकरणशीलतेने येणारा कथनव्यत्यय टाळत जातो.
प्रवाही कथनपद्धती, संविधानाची सहजप्रवाही रचना,
संयत भाषिक अभिव्यक्ती, सुस्पष्ट वैचारिक दृष्टिकोन,
आस्था आणि वस्तुनिष्ठता यांचे संतुलन, इतिहास आणि समकालीनता
यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्यांची जाणीव
इत्यादी या कादंबरीची वैशिष्ट्ये आहेत.
सर्जनाच्या पातळीवर इतिहासाचे पुनर्वाचन करणारी ही कादंबरी
मराठी परंपरेत लक्षणीय ठरेल.
– चंद्रशेखर जहागीरदार

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तंट्या | Tantya”

Your email address will not be published. Required fields are marked *