जननायक तंट्या भिल्ल | Jannayak Tantya Bhilla

₹200

152 Pages
AUTHOR :- Baba Bhand
ISBN :- 978-8177868265

एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश सत्तेविरुद्ध तंट्या भिल्लानं तापी-नर्मदाखोऱ्यात अकरा वर्षं एकाकी संघर्ष केला. तो गरिबांना लुबाडणारे जुलमी सावकार आणि सावकारांना मदत करणाऱ्या पोलिसांचा वैरी होता. गरिबांचा मात्र तो कैवारी होता.

महात्मा फुले गरिबांना शिकविण्यासाठी झगडत होते, तर हा आदिवासी क्रांतिवीर बलाढ्य ब्रिटिशसत्तेशी दऱ्याखोऱ्यात एकाकी झुंजत होता. शोषित अन नागवल्या गेलेल्या शेतकरी-आदिवासींना मदत करत होता सरकारने दरोडेखोर ठरविलेला हा आदिवासी वीर जनतेचा पालनहार बनला होता.

आमच्या इतिहासानं मात्र या क्रांतिवीराची दखलच घेतली नाही. बाबा भांड यांनी ब्रिटिशकालीन दस्तऐवज, लोकगीत, लोककथा अन् हजारो लोकांच्या मुखातून जनमानसात टिकून राहिलेल्या या जननायकाची चरित्रकथा लिहिली आहे. एका सामान्य माणसाच्या असामान्य स्वातंत्र्यलढ्याची ही अद्भुत कथा इतिहासाचे पुनर्वाचन करणारी आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जननायक तंट्या भिल्ल | Jannayak Tantya Bhilla”

Your email address will not be published. Required fields are marked *