आपल्या जडणघडणीत अनेकांची मदत होत असते. जन्मदाते आई-वडील, गुरुजनवर्ग, आजूबाजूंची परिसाचे हात आणि आभाळाची माया असलेली माणसं यात असतात. अशा माणसांच्या सहा गोष्टी इथं सांगितल्या आहेत. स्वत:पलीकडे बघून ‘बापू तू शिकलं पाहिजे’ सांगणारी आभाळाची सावली झालेली वेणूआई मांगीण आहे. गोरगरिबांचा कैवारी होऊन जुलमी सावकाराचा कर्दनकाळ झालेला तंट्या भिल्ल आहे. भीमराव आंबेडकर या हुशार मूलातील तेजस्वी नायक हेरणारे सयाजीराव गायकवाड तसेच आहेत. जीवनात आनंदी व्हायचं असेल तर पैशाने विकत घेता येणार नाही अशा गोष्टींचा शोध घ्या, दुसऱ्यास आनंद देण्याचं शिका, हे सूत्र सांगणारी आनंदयात्रा तशीच आहे. तर स्वतः काम करून कलेक्टर व्हायचं स्वप्न पाहणारा आदिवासी हुकूमचंद आडे हा उद्याचा आमचा नायकही एक आहे. आपापली कमाई खरी असावी, ही माझी बालवीर जीवनातील गोष्ट आयुष्य सुंदर करण्यास मदत करू शकेल. स्वत:पलीकडे बघायला सुरुवात करा. हे केलं तर आपलं जगणं सुंदर होऊ शकेल. त्याची सुरुवात मात्र आपण स्वत:पासून करायला हवी. – बाबा भांड
Reviews
There are no reviews yet.