महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या शेती, पाणी, उद्योग, व्यापार आणि अर्थकारणाच्या विविध पैलूंसंबंधीची भाषणे या खंडात संपादित करण्यात आली आहेत.
शेतीतूनच राष्ट्रीय संपत्ती निर्माण होत असते. या देशात शेतीवर अवलंबून असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्या शेतकर्यांस शास्त्रीय ज्ञान देऊन शेतीची क्रयशक्ती वाढवली पाहिजे. दुष्काळावर कायमस्वरूपाचा उपाय केला पाहिजे. पाटबंधारे, विहिरी, धरणे, कालवे करून पाण्याचा काटकसरीने उपयोग करणेही गरजेचे आहे. ग्रामसुधारणा, व्यापारउद्योगातील वाढ हाच प्रगतीचा मार्ग आहे. कृषी आणि उद्योगात समतोल राखणे, त्यास औद्योगिक शिक्षणाची जोड देणे; तसेच देशी व्यापार-धंद्यांना संरक्षण ही काळाची गरज आहे.
प्रजेची प्रत्येक क्षेत्रातील उच्च दर्जाची सेवा हीच राष्ट्राची खरी संपत्ती, हे विकासाचे सूत्र आहे. यासाठी नैतिक शुद्ध आचरणाचीही गरज आहे. शेतीतील नवे तंत्रज्ञान, प्रशिक्षित व उद्यमशील मनुष्यबळ, खनिजांच्या खाणी, सागरकिनारा, भरपूर पाणी, दळणवळणाचे जाळे, प्रोत्साहनपर वातावरण, आरोग्यसेवा आणि शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाल्यास संपन्न भारत घडविला जाईल, असे सयाजीराव गायकवाड यांनी वेळोवेळीच्या भाषणात सांगितले. या अर्थनीतीचे पुन:चिंतन हीच आजची गरज आहे.
Reviews
There are no reviews yet.