नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या अंगच्या कर्तृत्वाने जागतिक कीर्ती संपादन करावी व भारताच्या अर्वाचीन राष्ट्रपुरुषांत आपली गणना करून घेण्याइतकी लोकप्रियता मिळवावी हे विशेष आहे. महाराजांचे चरित्र हा अभ्यासूंना निरंतन स्फूर्तिकारक असाच विषय आहे.
महाराज परदेशी प्रवासात असले तरी स्वदेशी चाललेल्या सत्कार्याकडे त्यांची दृष्टी असे. युरोपातील उत्तम गोष्टी बडोद्यात कशा रुजवता येतील याचे ते चिंतन करत.
• बडोदे राजधानीचा विचार करू लागल्यास ही राजधानी म्हणजे जगातील प्रसिद्ध राजधान्यांचे एक लहानशे प्रतिरूपच अशी तिची योग्यता दिसून येते.
जगात पुढारलेले राष्ट्र म्हणून डौल मिरवणाऱ्या ब्रिटिशांना आपल्या सुधारणांपुढे लाजेने खाली मान करावयास लावणारे एकच एक सयाजीराव महाराज गायकवाड होऊन गेले. त्यांचे कर्तृत्व कोणत्याही काळातील राज्यकारभाराला मार्गदर्शक ठरावे अशा योग्यतेचे होते.
Reviews
There are no reviews yet.