महाराजा सयाजीराव आणि जन्मभूमीची ओढ

₹30

AUTHOR :- Baba Bhand

नाशिक जिल्ह्याचे सुपुत्र महाराजा सयाजीराव गायकवाड हे आधुनिक भारताचे एक शिल्पकार आहेत.

कवळाणे गावातील बारा वर्षांचा गोपाळ राजा बनला. राजा बनल्यानंतर शिकला आणि आयुष्यभर जनकल्याणाचे कार्य केले.
महाराजा सयाजीराव शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, ललित कला आणि वाङ्मयीन कलांचे आश्रयदाते होते.
शिक्षण, सुप्रशासन-न्याय, शेती उद्योगांना त्यांनी मदत केली.

पितामह नौरोजी, जमशेटजी टाटा, ना. गोखले, म. गांधी, लो. टिळक,
न्या. रानडे, म. फुले, कर्मवीर भाऊराव, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर,
पं. मालवीय, स्वा. सावरकर, महर्षी शिंदे हे आणि अनेकांना
कोट्यवधींची मदत करणारे त्यांचे दातृत्व होते. एवढेच नाही तर
स्वातंत्र्ययोद्ध्याचे ते एकमेव पाठीराखे होते.

अशा राजाला आपली जन्मभूमी कवळाणे, जिल्हा नाशिकची खूप ओढ होती. यातून त्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या. इथे काम करणाऱ्या व्यक्तींना शिष्यवृती देऊन, संस्थांना मदत करून सुप्रशासन आणि जनकल्याणातच आपला मोक्ष शोधणाऱ्या या राजाची जन्मभूमीसंबंधीची ओढ या पुस्तकातून दिसून येईल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाराजा सयाजीराव आणि जन्मभूमीची ओढ”

Your email address will not be published. Required fields are marked *