गंगारामभाऊ म्हस्के लोकहितवादी, महात्मा फुले आणि न्यायमूर्ती रानडेंचे समकालीन सुधारक होते.
त्यांच्या बालपणीच आई-वडिलांनी नाशिक जिल्ह्यातील रंगराव ओढे खेडेगावातून पुण्यामध्ये उदरनिर्वाहासाठी स्थलांतर केले. वडील लष्कर परिसरात हमाली करू लागले. तर गंगारामभाऊंनी मिशन स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी काही काळ नोकरी केली.
त्यानंतर पुन्हा अभ्यास करून अल्पावधीत वकिलीची सनद मिळवली. वकिली सुरू केली. मोठमोठे खटले चालवून विद्वत्तेने नाव कमवले.
सर्व सुधारणांचा पाया शिक्षण आहे हे त्यांनी ओळखले होते. म्हणूनच त्यांनी सर्वप्रथम सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी परिश्रम घेतले. प्राथमिक शाळा स्थापन केल्यावर अनेक शिक्षण संस्थांची उभारणी केली. उच्चशिक्षण देशात आणि अगदी परदेशातसुद्धा घेता यावे म्हणून डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या मार्फत शिष्यवृत्त्या सुरू केल्या. यामधून हजारो विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेतले.
गंगारामभाऊंचे कार्य श्रेष्ठ होते. इतिहासाचार्य वि.का. राजवाडेंनी ‘महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान व कर्त्या लोकांची मोजदाद’ या संशोधनपर आणि अभ्यासपूर्ण लेखात गंगारामभाऊंचा समावेश करून एकशे पन्नास लोकांमध्ये त्यांना ‘शिक्षण संस्थापक’ म्हणून पस्तीस क्रमांक दिला आहे.
गंगारामभाऊंचे समकालीन लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, महात्मा जोतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे, नामदार गोपाळ कृष्ण गोखले आणि लोकमान्य टिळक त्यांचा सल्ला घेत. या महान सुधारकांना सल्ला देणारे गंगारामभाऊ म्हस्केही तितकेच महनीय आणि आदरणीय महानायक होते.
Reviews
There are no reviews yet.