बलाढ्य ब्रिटिश सत्तेशी तंट्या भिल्ल या आदिवासी नायकाने एकोणिसाव्या शतकात दीर्घकाळ संघर्ष केला. हा क्रांतिवीर दीनदुबळ्यांचा जननायक आणि जुलमी सत्तेचा कर्दनकाळ ठरला; पण कोणत्याही लेखकास, इतिहासकाराला तंट्या भिल्लाच्या पराक्रमाचे गूढ उकलावेसे वाटले नाही.
हे काम केले बाबा भांड या लेखकाने. कादंबरी, चरित्र, शोधाची कहाणी, किशोर कादंबरी, संदर्भ साहित्य या वाङ्मयाच्या सर्व अंगाने लेखकाने तंट्याबद्दल लेखन केलेय. हा मराठीतील एकमेव प्रयत्न आहे.
तंट्याबद्दल… या संपादनात तंट्या कादंबरीबद्दल डॉ. किशोर सानप यांनी लेखक बाबा भांड या लेखकाची नैतिकता आणि व्रतस्थपणे कष्टसाध्य सर्जनशील लेखनशैलीचा आढावा घेतला आहे. तसेच तंट्यासंबंधीचे लेख, पत्रे, मुलाखती, टिपणातून तंट्याचे दर्शन घडविले आहे.
प्रतिभावंताला तीन डोळे असतात. तिसरा डोळा प्रतिभेच्या साक्षात्काराचा आणि सत्याच्या पारदर्शी दर्शनाचा असतो. बाबा भांड यांच्या दशक्रिया, तंट्या आणि युगद्रष्टा महाराजा या तिन्ही सर्जनशील कलाकृती जवळपास तीन तपांच्या प्रातिभ तपश्चर्येचे सुजलाम-सुफलाम प्रतिफूल आहे.
‘तंट्याबद्दल…’मधून जननायक तंट्या उदंड प्रेरणा-ऊर्जा-आत्मविेशास देईल, अशी खात्री आहे. अभ्यासकांना परिश्रमनिष्ठास्व यंभू शोधवृत्ती-लेखकाची नैतिकता-करुणा-कळवळा-जाज्वल्यवृत्ती आदींसह सृजनाची भूमीही सुजलाम-सुफलाम करणारी प्रतिभा प्राप्त करण्याची ऊर्मी दाटून येतील; याविषयी खात्री बाळगणारे हे संपादन आहे.
Reviews
There are no reviews yet.