बाबा भांड यांनी सांगितलेली महाराजा सयाजीराव गायकवाड आणि त्यांचा बालमित्र चिंध्या यांच्या जगावेगळ्या मैत्रीची ही गोष्ट मोठीच रोमांचकारी आहे !
उंडारलेल्या खोंडाला चातुर्याने वठणीवर आणणारा गुराखी गोपाळ आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पुढे बडोदा संस्थानचा राजा बनतो, ही गोष्ट बालकुमारांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे !
सयाजीराव महाराज आपल्या बालमित्रांना राजदरबारात बोलावून त्यांचा यथायोग्य सन्मान करतात. चिंध्या आणि महाराजांची गळाभेट पाहताना कृष्ण – सुदाम्याच्या मैत्रीची हमखास आठवण होते.
आपल्या सर्वसामान्य मित्रांसोबत रस्त्यावर गावपंगतीत बसून भोजन करणाऱ्या ह्या जगावेगळ्या महाराजाने देशाच्या सामाजिक क्रांतीत मोठेच योगदान दिले आहे. कवळाणा जन्मगावी आपल्या बालमित्राला भेटण्यासाठी ढेकळांतून वाट काढणाऱ्या ह्या कर्त्या सुधारकाने सामाजिक समतेचा मार्ग प्रशस्त केला.
लेखक बाबा भांड यांनी ह्या गोष्टीच्या माध्यमातून क्रीडनप्रवृत्ती, मैत्री, साहस, आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती, सहकार्य, समानता, संस्कृती संवर्धन, स्वातंत्र्याची ओढ आणि निर्व्यसनी जीवनशैलीचे संस्कार बिंबविण्याचा प्रयत्न केला आहे.
दिलदार वृत्तीच्या आणि दूरदृष्टीच्या राजाची ही स्फूर्तिदायी गोष्ट बालकुमार वाचकांना निश्चित आवडेल, असा विश्वास वाटतो.
– डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
Reviews
There are no reviews yet.