बाबा भांड : अल्प परिचय
जन्म : 28 जुलै 1949ला एका सुदूर खेड्यात. शिक्षण : एम. ए. (इंग्रजी), बी. एड.
आठवीत असताना बालवीर चळवळीत राष्ट्रपती पदकाने सन्मानित. प्रारंभीच्या महाविद्यालयीन जीवनात बालवीरांच्या कॅनडा-अमेरिकेतील जागतिक मेळाव्यात सहभाग आणि याचवेळी दहा देशांचा प्रवास. शाळेत असल्यापासून सर्जनशील लेखनास सुरुवात. सहावीत असताना डायरी लिहिली. हे पहिलं-वहिलं लिखाण अलीकडं 2001 मध्ये प्रकाशित.1975 मध्ये पत्नी सौ. आशा सोबत धारा व नंतर साकेत प्रकाशनाची स्थापना. आतापर्यंत 1500 पुस्तके प्रकाशित केली आहेत. राष्ट्रीय साक्षरता मिशनमध्ये नवसाक्षरांसाठी पुस्तके लिहून आणि प्रकाशित करून सहभाग. नवसाक्षरांसाठी `शब्दसंगत’, मुलांसाठी `साकेत सवंगडी’ नियतकालिकांचे दीर्घकाल संपादन, प्रकाशन. सुरुवातीपासून लेखन प्रकाशनाचे काम. अल्पकाळ अध्यापन.बाबा भांड यांच्या आतापर्यंत नऊ कादंबऱ्या, आठ चरित्र, दोन कथासंग्रह, पाच प्रवासवर्णने, सहा ललित गद्य, पाच आरोग्य व योग, चार संपादित, आठ संशोधन-इतिहास, चार बालकथा, अकरा बालकादंबरी, तीन एकांकिका, अकरा किशोर कादंबऱ्या, चौदा किशोर कथा, अनुवादित पाच बालकथा, आणि बत्तीस नवसाक्षरांसाठी पुस्तके अशी विविध पुस्तके प्रकाशित.
महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचे अकरा पुरस्कार, साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन, भैरुरतन दमाणी, नरहर कुरुंदकर, सांगाती अकादमी, इचलकरंजीकर ट्रस्ट, म.सा.प. पुणे, दाते कादंबरी वर्धा, साहित्य संमेलन, बालसाहित्याचा राष्ट्रीय असे विविध पुरस्कार. साहित्याचा हिंदी, इंग्रजी, कानडी, गुजरातीत अनुवाद.महाराष्ट्र शासनाचा 2009 चा श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार साकेत प्रकाशनास.
मराठी नववी पाठ्यपुस्तकात पाठ, मुक्त विद्यापीठ नाशिक धर्मा, इतर विद्यापीठांत दशक्रिया, काजोळ, सादाको, कोसलाबद्दल अभ्यासक्रमात. पुणे विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सहा विद्यार्थ्यांची भांड यांच्या साहित्यावर पीएच.डी. सहा विद्यार्थ्यांनी दशक्रिया, तंट्या, योगी वर एम.फिल केले.प्रकाशनाशिवाय जन्मगावी ग्रामविकासाअंतर्गत पाणलोट क्षेत्र विकास, छत्रपती शाहू वाचनालय, खेड्यातील गरीब शेतमजुरांच्या अपंग-मूकबधिर मुलांसाठी निवासी शाळा, काहीकाळ वृद्धाश्रम, शरीर व मनस्वास्थ्यासाठी योगसाधना संस्थेत विश्र्वस्त. मराठी बालकुमार साहित्य संमेलन आयोजनात सहभाग. अ. भा. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या 9व्या अ. भा. मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. आता सर्व संस्थात्मक कामातून स्वेच्छा निवृत्ती आणि पूर्णवेळ वाचन, लेखन, प्रकाशनासह शेती, छायाचित्रण छंद. जगातील पंच्याहत्तरहून अधिक देशांचा प्रवास.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष, महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन यांचे सचिव. महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे सचिव.
सन्मान/Awards
महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार :
1) धर्मा, किशोर कादंबरी (1980)
2) पांगोरे, ललितगद्य (1982)
3) काजोळ, कादंबरी (1985)
4) कायापालट, कथा (1989)
5) रंग नाही पाण्याला, किशोर कादंबरी (1990)
6) दशक्रिया, कादंबरी (1995)
7) नीतिकथा, किशोरकथा (1998)
8) तंट्या, कादंबरी (2001)
9) श्रेष्ठ भारतीय बालकथा, संपादन (2001)
10) जननायक तंट्या भिल्ल, चरित्र (2003)
11) लोकपाळ राजा सयाजीराव, चरित्र, (2014)
इतर संस्थांचे पुरस्कार
1) भारत स्काऊट/गाईड संस्थेचा `राष्ट्रपती स्काऊट’ (प्रेसिडेंट स्काऊट) अवार्ड, आठव्या वर्गात, 1966.
2) अ. भा. मराठी बालसाहित्य परिषद पुणे यांचा “आनंदमेळा” पुस्तकास कोठावळे पुरस्कार, 1989.
3) विकास वार्ता पारितोषिक, महाराष्ट्र शासन प्रसिद्धी विभाग, मुंबई, 1989.
4) धर्मा किशोर कादंबरीस भारतीय शिक्षण परिषद दिल्ली यांचा बालसाहित्य पुरस्कार, 1989.
5) ग्रंथालय कार्यकर्ता खटखटे पुरस्कार, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई, 1989.
6) दमाणी साहित्य पुरस्कार, सोलापूर, दशक्रिया कादंबरीसाठी, 1996.
7) महाराष्ट्र फाऊंडेशन (यू.एस.ए.) पुरस्कार दशक्रिया कादंबरीसाठी, 1996.
8) कै. नरहर कुरुंदकर पुरस्कार, जि. प. नांदेड, 1996.
9) सांगाती अकादमी पुरस्कार, बेळगाव, दशक्रिया कादंबरीसाठी, 1996.
10) इचलकरंजी एज्युकेशनल ट्रस्ट पुरस्कार, दशक्रियास 1996.
11) महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ह. ना. आपटे पुरस्कार, दशक्रियास 1996.
12) बाबा पदमजी कादंबरी पुरस्कार, तंट्या कादंबरी, 2002.
13) प्रसाद बन साहित्य पुरस्कार, नांदेड, 2008.
14) आचार्य अत्रे प्रतिष्ठान सासवडचा साहित्य पुरस्कार, 2010.
15) मारवाडी युवा मंच परळीचा साहित्य पुरस्कार, 2012.
साकेत प्रकाशनास विविध पुरस्कार :
• वि.भा. पाठक प्रकाशक पुरस्कार, परभणी, 1995.
• मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबादचा रा.ज. देशमुख प्रकाशक पुरस्कार, 2002.
• बालकुमार संमेलन सातारा येथे उत्कृष्ट बालसाहित्य प्रकाशन पुरस्कार, 2003.
• दि. इंडियन पब्लिशर्स फाऊंडेशन दिल्लीचा ग्रंथनिर्मिती राष्ट्रीय पुरस्कार, 2007, 2008, 2009.
• म. रा. साहित्य संस्कृती मंडळाचा यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार, 2004.
बाबा भांड यांच्या साहित्यावर पीएच.डी., एम.फिल संशोधन
• मराठी बालसाहित्य आणि बाबा भांड यांचे बालसाहित्य, डॉ. संतोष मोरे, डॉ. बा. आं. विद्यापीठ, औ.बाद, 2006.
• बाबा भांड यांच्या एकूण साहित्यावर डॉ. रमेश मोरे यांना पीएच.डी. 2007.
• बाबा भांड यांच्या कादंबऱ्यावर डॉ. केशव पाटील यांनी स्वा. रा. तीर्थ विद्यापीठ, नांदेड येथे पीएच.डी., 2011.
• बाबा भांड यांच्या कादंबऱ्यातील लोकतत्त्वीय सूत्रांचा अभ्यास प्रा. संजय पाटील करीत आहेत.
• आबा महाजन हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे बालसाहित्यावर संशोधन करत आहेत.
• म. राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या वर्ग नववीच्या मराठी पुस्तकात पाठ्यांश.
• दशक्रिया, काजोळ, सादाको, योगी, तंट्या या पुस्तकांवर सात विद्यार्थ्यांनी एम.फिल केले.
• यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक बालसाहित्य विषयासाठी `धर्मा’ कादंबरीचा अभ्यास.
• स्वा. रा. तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड बालसाहित्य विषयात `सादाको’ अभ्यासक्रमास.
• दशक्रिया, काजोळ, कोसलाबद्दल विविध विद्यापीठात अभ्यासासाठी.
समाजोपयोगी प्रकल्प
• छत्रपती शाहू सार्वजनिक वाचनालय, वडजी या जन्मगावी. ब वर्ग संस्थापक सदस्य.
• लोकशिक्षण संस्थेचे चिटणीस 1984 ते 1998 पर्यंत.
• जन्मगाव वडजी व आजूबाजूच्या आठ गावात पाणलोट क्षेत्र विकासाचे काम 1990 ते 95.
• खेड्यापाड्यातील अपंग-मूकबधिर मुलांसाठी 1984 पासून निवासी शाळा. काही काळ वृद्धाश्रम.
• शरीर आणि मनस्वास्थ्यासाठी योगसाधना संस्थात 1994 पासून मुख्य विश्र्वस्त.
• लेखन, प्रकाशनाचे काम करण्यासाठी वरील सर्व संस्थातून 1998 पासून स्वेच्छा निवृत्ती.
आवड आणि छंद
• प्रवास, वाचन आणि फोटोग्राफी.
• जगातील पंचेचाळीस देशांचा प्रवास. दक्षिण अमेरिका वगळता सर्व भागाचा प्रवास.
• जगातील सहा आश्र्चर्ये, युनोस्कोच्या जागतिक वारसाचे 120 स्थळांची छायाचित्रे संग्रही.
संमेलन/अध्यक्ष
• दुसरे मराठी बाल कुमार साहित्य संमेलन अध्यक्ष, नायगाव जि. नांदेड, 1993.
• दहावे मराठवाडा युवक साहित्य संमेलन, आष्टी, जि. बीड, अध्यक्ष, 1997.
• नववे अ. भा. मराठा साहित्य संमेलन, चंद्रपूर, 2012.